×
Homeताज्या बातम्याBJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | आदित्य सेनेच्या टक्केवारीमुळेच मुंबईकर हद्दपार...

BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | आदित्य सेनेच्या टक्केवारीमुळेच मुंबईकर हद्दपार होतोय, भ्रष्ट बिल्डरांवर कारवाई करा; नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे पूत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून यामध्ये आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aaditya Thackeray) आणि एकुणच शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील (Shivsena In BMC) कारभाराबाबत आरोप केले आहेत. या पत्रात नितेश यांनी आरोप केला आहे की, मनपाच्या निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आदित्य सेनेने मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलटा बोंबा मारणे सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांना टक्केवारी देणार्‍या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे. (BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis)

 

या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एसआरएमधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दिड वर्षांचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे.

 

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, एका बाजूला कोविडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेली आणि दुसीकडे मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. आहे ते घर विकासकाने अडवून ठेवले आहे आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होत आहे. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळत आहे ना हक्काचे भाडेही मिळत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वस्त दरात विकण्यास बाध्य होतात.

या पत्रात नितेश यांनी मागणी केली आहे की, अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने ठोस
पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणार्‍या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा.

 

 

Web Title :- bjp mla nitesh rane letter to deputy cm devendra fadnavis target to shivsena uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News