BJP MLA Nitesh Rane | नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर, म्हणाले-‘ आमदार गेले तरी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाबाबत (Thackeray Group) मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणूक (Assembly Elections) ठाकरे गट घड्याळ चिन्हावर लढणार आहे, असा दावा नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला आहे. राणेंच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राणेंच्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार, खासदार गेले तरीही…
वैभव नाईक म्हणाले, नितेश राणेंनी आपला पक्ष किती दिवसांत विलीन केला, याचा इतिहास पाहिला पाहिजे. ईडीच्या (ED) भितीने काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडत स्वत:चा पक्ष स्थापन केल. पण, स्वत:च्या पक्षाचा एक आमदार निवडून आणू शकले नाहीत. ते उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षावर बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांनी अनेक आमदार तयार केले. हे आमदार गेले तरी दुसरी फळी तयार झाली आहे. खासदार, आमदार गेले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Uddhav Balasaheb Thackeray Party) लोकप्रियता वाढत आहे.
आमच्या पक्षाची चिंता करु नये
नितेश राणे यांनी आमच्या आमदारांची आणि पक्षाची चिंता करु नये.
आपलं भाजपातील (BJP) स्थान आणि मंत्रीपद कसे मिळेल, याची चिंता करावी.
आमचं चिन्ह, नाव गेलं तरीही पक्ष दुपटीने वाढत आहे.
राणेंनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करुन लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात.
म्हणजे त्यांना आमच्या पक्षाची लोकप्रियता किती आहे, हे समजेल, असं आव्हान वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिले.
Web Title : BJP MLA Nitesh Rane | mla vaibhav naik reply bjp mla nitesh rane over ubt candidate election ncp
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा