मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – म्हाडा वसाहतीतील (Mhada Colony) कार्यालय तोडण्यावरुन शिवसेना (Shivsena) नेते आमदार अनिल परब (MLA Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आमने-सामने आले आहेत. अनिल परबांचं कार्यालय तोडले. तसेच नारायण राणे (Narayan Rane) यांचं घर तोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे माझ्याबरोबर येणार का? मी तिथे सर्व म्हाडातील लोकांना घेऊन जाणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली.
नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले, अनिल परबांनी तारीख आणि वेळ सांगावी, आम्ही त्यांच्यासाठी चहा तयार ठेवतो. कोरड्या धमक्या देऊ नये. न्यायालय न्यायालयाचे काम करेल. आमच्या घरात येऊन, धिंगाणा घालणं सोप्प नसून, हे ‘मातोश्री’ (Matoshree) नाही. आम्ही पण असं स्वागत करु की परत राणेंच्या घराजवळ फिरकणार नाहीत.
परबांचे घर झाकी ‘मातोश्री 2’ बाकी है
दुसऱ्यांची घरं पाडण्याची तयारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच.
आमचं, कंगणाचं घर सोडले. कधी कोणाला अटक केली. अनिल परब हे मातोश्रीचे कारकून आहेत.
उद्धव ठाकेरेंच्यात हिम्मत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाXX आहेत.
त्यांना परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे परबांचं घर झाकी है मातोश्री 2 बाकी है,
मातोश्री 2 मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
Web Title :- BJP MLA Nitesh Rane | nitesh rane attacks uddhav thackeray over anil parab mhada home
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Pimpri Crime News | दुसऱ्या तरुणासोबत का बोलतेस म्हणत महिलेचा विनयभंग, भोसरी परिसरातील घटना
Budget 2023 | ‘या’ आहेत मोदी सरकारच्या शिक्षणक्षेत्रासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी