BJP MLA Nitesh Rane | ‘हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा…’, आमदार नितेश राणेंचा इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रुपाने एक कडवट हिंदुत्ववादी (Hindutva) माणूस गृहमंत्री म्हणून बसले असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच हिंदू म्हणून आवाज उठवणाऱ्यांना सुखरुप घरी पाठवेन असा शब्दही आंदोलकांना दिला. आज (बुधवार) कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आंदोलकांना संबोधित केले.

नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले, मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नाही. सगळे पोलीस (Police) तसे नसतात, पण काही मोजके जे नालायक आहेत त्यांना तर शिक्षा मिळणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. परंतु सगळ्याच पोलिसांना जे बोललं जातंय ते चुकीचं आहे. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) मंत्री नाही, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) नाही.

…तर ते त्याला जीवंत ठेवत नाही

मुस्लिम समुदायाचे उदाहरण देत नितेश राणे म्हणाले, मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. मात्र, आपल्याला टोप्या घालाव्या लागतात, गमछे घालावे लागतात, घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला किरण पावसकर (Kiran Pavaskar), नितेश राणे लागतात, मगच आपण काहीतरी करतो. हीच आपली शोकांतिका आहे.

चुलीत जाऊ द्या आमदारकी

आम्ही भाषणं देण्यासाठी इथं जमलेलो नाही. चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही. मी मरताना ते आमदार पद लागणार नाहीये. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत. म्हणून हिंदू म्हणून कसे जगणार आहात, हिंदू म्हणून आपल्या धर्माचं कसं रक्षण करणार आहात हे आज ठरवण्याची गरज आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केलं.

Advt.

तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आहे?

नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरूणीसोबत लग्न केलं. त्यानंतर तिथल्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन
त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणं देत बसली नाही,
टोप्या घालत घोषणा देत बसली नाही. घरामध्ये माता-भगिनी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा
आणि भगवा गमछा घालण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल राणेंनी केला.

Web Title :-  BJP MLA Nitesh Rane | nitesh rane say do not care mla or mp designation in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

Qala Movie | बहुचर्चित काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…