BJP MLA Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई, सरपंच तरी होतील का?, भाजप आमदार नितेश राणेंचा ‘प्रहार’ (व्हिडिओ)

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावण्यात आले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीपासून (Mahavikas Aghadi) आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हॉस्पिटलमध्ये असताना मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, सद्यस्थितीत शिल्लक सेनेला आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? अशी टीका नितेश राणे यांनी केली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री (Congress Former CM) सांगतात की ठाकरे सेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष, मग आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? असा सवाल राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी उपस्थित केला.

भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) मंगळवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शन घेत महाआरती केली. यावेळी हिंदु संघटना उपस्थित होत्या. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. दरम्यान दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) इमारतीवरुन राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच लोकशाही संपवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत टेबल पत्रकार आहे. त्यांना नवीन संसद भवनाबाबत किती माहिती आहे,
याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे.
नवीन संसद भवन म्हणजे देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. भारतीयांना याबाबत अभिमान वाटायला हवा. मला संजय राऊतांना विचारचं आहे, जुनी मातोश्री मोडकळीस आली नव्हती, मग नवीन मातोश्री कशाला बांधली. पैसा जास्त झाला होता का. मोदींनी ती इमारत देशासाठी बांधली आहे. स्वत:ला बसण्यासाठी बांधलेली नाही, असे राणे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांना उद्देशून राणे म्हणाले, संजय राऊतांचे मालक ज्यावेळी मुख्यमंत्री होते.
त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचे स्मारक (Balasaheb Thackeray Memorial) तरी बांधू शकले का.
स्वत:चा बाप चोरला म्हणून ओरडत बसतात, स्वत: वडीलांचं स्मारक अडीच वर्षाच्या कार्यकाळात बांधता आलं का?
असा सवाल करत बाळासाहेबांनी सांगितलं आहे की, काँग्रेस समोर झुकणारे हिजडे असतात. मग आता हे काय करतात?
अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे पुढे म्हणाले, त्र्यंबकेश्वर हे आमचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आम्ही तिथे जात आहोत.
आपली हिंदू म्हणून महाआरती करणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी
त्र्यंबकेश्वर मंदिरावर आपली भूमिका मांडली. यावर बोलताना राणे म्हणाले, मी काय त्यांना क्रॉस करणार नाही.
तिथे स्पष्ट लिहिलं आहे की, हिंदुंशिवाय इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणी ढवळाढवळ करु नये.
आमचा आजचा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार लागला आहे.
ज्यांचा विरोध आहे, त्यांनी सोबत यावं आणि भूमिका मांडावी, असे आवाहन नितेश राणे यांनी केलं.

Web Title :  BJP MLA Nitesh Rane | nitesh rane strongly criticized aditya thackeray over cm banner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !

Ajit Pawar on Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणावरुन अजित पवारांचा समीर वानखडेंवर शाब्दीक हल्ला, म्हणाले- ‘तेव्हा मलिकांना खोटं ठरवण्याचा…’ (व्हिडिओ)