BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना सूरत कोर्टाने (Surat Court) शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांची केवळ खासदारकी (Rahul Gandhi Disqualification) काढून घेऊन थांबू नका, जसा अजमल कसाब (Ajmal Kasab) वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तसा राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तामध्ये हकलून द्या, अशी मागणी नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केली आहे. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधींना थोबाड बंद करायला सांगा
नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) पुढे म्हणाले, मोदी नावाचे सगळे चोर आहेत बोलायला आणि ओबीसी समाजाची (OBC Community) बदनामी, देशाची बदनामी करायला भाजपने सांगितले नव्हते. तसेच न्यायालयात गेलेला माणूस ही भाजपचा नव्हता. बदनामी राहुल गांधी करायची आणि आता कायद्याने काम केले की भाजपच्या नावाने बोंबलायचं हा कुठला नियम? यापेक्षा राहुल गांधींना भाषण येत नसेल तर थोबाड बंद करायला सांगा, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली.
महाराष्ट्रात लँड जिहाद सुरु
नितेश राणे यांनी सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद (Land Jihad) सुरु झाल्याचा दावा केला. अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची डुक्कर कापायची. जेणेकरुन हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सध्या सुरु आहे. मुद्दा या कारवाईचा आहे. त्याला स्क्रिप्टेड म्हणा किंवा अन्य काही म्हणा असेही नितेश राणे म्हणाले.
लव्ह जिहाद विरोधात कायदा करावा
नितेश राणे पुढे म्हणाले, लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना देखील याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जात आहे. मुंब्राचा जित्तूदिन आणि अबू आझमी लव्ह जिहादची (Love Jihad) आकडेवारी खोटे असल्याचा दावा करत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
इम्तियाज जलील लँड जिहाद झाकण्याचा प्रयत्न करत आहेत
तसेच काही जिहाद्यांकडून हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होते याचे प्रयत्न होत असतात.
याबाबत मी भाषणात केलेल वक्तव्य हे सत्याच्या आधारावर केले आहे. राज्यात जे काही मुस्लिम समाजाचे
लँड पाडले गेले, हे जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) याला स्क्रिप्टेड
किंवा राजकीय रंग देऊन राज्यात लँड जिहाद जे सुरु आहेत त्याला झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
नितेश राणे यांनी केला.
Web Title :- BJP MLA Nitesh Rane | rahul gandhi disqualified bjp mla nitesh rane says rahul gandhi sent to pakistan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update