BJP MLA Nitesh Rane | ‘मी बेट लावून सांगतो…येत्या तीन महिन्यात राऊत पुन्हा तुरुंगात जाणार’; नितेश राणेंचा मोठा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) दिला आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर ठाकरे गटाने (Thackeray Group) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना तीन महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु यावरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी संजय राऊतांसंदर्भात मोठा दावा केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) येत्या तीन महिन्यात पुन्हा तुरुंगात जाणार असल्याचा दावा नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला.

नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले, भाजपच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्ही गप्प बसणार नाही. धमकी देण्याचे दिवस गेले. जे काही योग्य वाटतंय तेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे दिलेले नाही. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुला काय करायचं ते कर, असा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी राऊतांना थेट आव्हान दिलं आहे.

 

तीन महिन्यात पुन्हा जेलमध्ये

नितेश राणे पुढे म्हणाले, मी बेट लावून सांगतो की येत्या तीन महिन्यांत हा जेलमध्ये जातो की नाही पहा. तीन महिन्यानंतर हा तुम्हाला बाहेर दिसणार नाही. पत्राचाळच्या केसमध्ये (Patra Chawl Scam) आरोप निश्चित झालेला आहे. आता हा 90 दिवसांचा मेहमान आहे. 90 दिवसांनी हा जेलमध्ये दिसेल, असा दावा राणे यांनी केला.

 

राऊतांमध्ये मविआ सरकार पडलं

संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं.
2019 पासून उद्धव ठाकरेंच्या पदाला सुरुंग लावण्याचं काम करत होता.
ज्या खुर्चीवर याचा डोळा होता त्या खुर्चीवर पवार साहेबांनी ठाकरेंना बसवलं.
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईम बॉम्ब लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | Shivsena UBT MP sanjay-raut-will-go-back-to-jail-in-next-three-months-nitesh-ranes-big-claim-will-be-arrested-under-this-crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

pune University News | पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे निधन

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना तेव्हापासूनच भाजपमध्ये जायचं होतं’, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

MP Supriya Sule | मोफत तिकिटासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी ! अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत
सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या – ‘खासदारांना अशी वागणूक तर…’