BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) शिवसैनिकावर हल्ला केल्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) अडचणीच्या जाळ्यात सापडले असल्याचे दिसत आहे. शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात (Kankavali Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. नितेश राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता नेमण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी उद्या (मंगळवार) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते (Sachin Satpute) याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी (Sindhudurg Rural Police) दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक (Arrested) केली आहे. सचिन सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. म्हणून या प्रकरणी नितेश राणे यांची तीनवेळा कणकवली पोलिसांनी चौकशी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. प्रदीप दत्तात्रय घरात (Adv. Pradeep Dattatraya Gharat) मुंबई आणि सह अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. भूषण रामचंद्र साळवी (Adv. Bhushan Ramchandra Salvi) यांची नियुक्ती केली गेली आहे.
पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे (SP Rajendra Dabhade) यांनी सदर पत्र अपर मुख्य सचिव गृह विभाग महाराष्ट्र सरकार यांना पत्राद्वारे कळवलं आहे.
त्यामुळे शिवसैनिक परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला नितेश राणेंची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी अटक पूर्व जामिनासाठी (Pre-arrest bail) जिल्हा सत्र न्यायालयात (District Sessions Court) धाव घेतली आहे.
यावर उद्या मंगळवारी सुनावणी (Hearing) होणार आहे.

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | shivsena workers attack case BJP MLA nitesh ranes pre arrest bail application heard in court tomorrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 38 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी 

 

Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने