नितेश राणेंचा दावा – ‘मुख्यमंत्र्यांकडून आदित्य ठाकरेंचा बचाव म्हणजेच दाल में कुछ काला है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)प्रकरण असो की, दिशा सालियन (Disha Salian) प्रकरण असो त्याबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण देऊन त्यांचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा बचाव केला. याचाच अर्थ दाल में कुछ काला है असा दावा भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane)यांनी केला आहे. इतकंच नाही तर या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे याचा तपास झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नितेश राणे म्हणाले, “सुशांत सिंह राजपूत प्रकरण असो की, दिशा सालियन प्रकरण असो आम्ही कुणीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नव्हतं. त्यावर आदित्य ठाकरेंनी स्वत: परिपत्रक काढून स्पष्टीकरण दिलं. आता त्यांच्या वडिलांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं याचाच अर्थ दाल में कुछ काला है हे स्पष्ट होतंय.”

पुढं बोलताना राणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाला क्लीन चीट (clean chit) देत बसू नये. तुमचा मुलगा श्रावणबाळ आहे म्हणूनच तो दिनोच्या घरी सायंकाली तुळशी पूजा करायला जातो का ? तो दुधानं धुतलेला नाही. महाराष्ट्राची (Maharashtra) बदनामी आम्ही केलेली नाही. विरोधी पक्षानंही केलेली नाही. महाराष्ट्राची बदनामी कुणी केली असेल तर या श्रावणबाळानंच केली आहे. त्याच्या रात्रीच्या धंद्यांवर कंट्रोल ठेवला असता तर आज हे घडलंच नसतं. सुशांत सिंह-दिशा सालियान यांचा जीव गेलाच नसता. कंगना रणौतचं (Kangana Ranaut) ऑफिस तोडायला लागलं नसतं.” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

नितेश राणे असंही म्हणाले, सुशांत सिंह प्रकरण आणि दिशा सालियन प्रकरण सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. बिहारच्या वकिलानं कोर्टात आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं आहे. असं असताना मुख्यमंत्री मुलाला क्लीन चीट देत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच असं होत आहे.”

एवढीच खुमखुमी असेल तर दिशा सालियन प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करा. पोलिसांना खुलास तपास करू द्या. 8 तारखेला काय झालं ? तिथं कोण होतं ? मोबाईल टॉवरचं लोकेशन काय होतं ? सर्वांना कळू द्या. हे सगळं बाहेर आलं तर क्लीन चीट सोडा, कुणाकुणाला जेलची हवा खावी लागेल ना त्याच्या ब्रेकिंग बातम्या (Breaking News) बनतील असा दावाही नितेश राणे यांनी केला.

You might also like