BJP MLA Nitesh Rane । आदित्य ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नीतेश राणेंनी ट्वीट करत शब्द घेतले मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shiv Sena) नेत्यांवर सतत टेकेची झोड उठवण्याचे काम भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे करत असते. त्यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरु असतोच. या पद्धतीनेच नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत शिवसेना युवानेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात वातावरण तापण्याची दाट शक्यता असल्याचे दिसताच नितेश राणेंनी (MLA Nitesh Rane) आपलं आक्षेपार्ह ट्विट मागे घेतलं आहे. यामुळे आता चिघळणारा वाद निवळण्याची शक्यता आहे.

12 आमदारांचं निलंबन केल्याच्या मुद्यावरून भाजप (BJP ) आक्रमक झालं आहे. त्यात मंगळवारी विधानभवनमध्ये न जाता, विधानभवन पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. त्यावेळी भाजपचे आमदार नितेश (MLA Nitesh Rane) राणेनी देखील प्रति विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर नितेश राणेंनी म्हटले होते की, आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहे का? त्यांची DNA चाचणी करावी लागेल,असं भाष्य त्यांनी केलं होत. या विधानामुळे राज्यात वातावरणात परिणाम दिसून येत होता.

नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे, मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला
आणि माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावं, असा इशारा देखील दिला गेला. या
विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असल्याने त्यांनी अखेर त्यांचं ट्विट मागे घेतलं
आहे. ‘विधान भवनाबाहेर काल (मंगळवारी) सवांद साधत असताना भाषण करताना आदित्य ठाकरे
यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या
भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असं नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

हे देखील वाचा

Shivsena | फडणवीसांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचे निलंबन झाले त्यावेळी सामूहिक हत्याकांड वाटलं नव्हतं का? – शिवसेना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  BJP MLA Nitesh Rane take back his words used for aaditya thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update