जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदार भोळे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याला त्यांनी दुजोरा दिला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्वांना रात्री 10 वाजेच्या आत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 दुकानांवर कारवाई करून पोलिसांनी चौघावर गुन्हे दाखल केले आहेत.