BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – BJP MLA Pankaj Singh | पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागला यामध्ये पाचपैकी चार राज्यात कमळ फुललं आहे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (AAP) कमाल केली आहे. पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेस पक्षाला (Congress party) मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार भाजपने (BJP) चार राज्य मिळवण्यात यश मिळवलं आहे. मात्र यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे या पाच राज्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रेकॉर्ड मोडला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार पंकज सिंह (BJP MLA Pankaj Singh) यांनी हा रेकॉर्ड मोडला आहे.

 

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) मतदारसंघातून पंकज सिंह निवडून आले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) सुनील चौधरी आणि बसपाकडून कृपाराम शर्मा (Kriparam Sharma) यांच्या विरोधात मोठा पराभव केला आहे. पंकज सिंह (BJP MLA Pankaj Singh) यांनी तब्बल 1 लाख 79 हजार मतांनी जिंकून नवा रेकॉर्ड केला आहे.

 

दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawat) यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवला होता.
याआधीही त्यांनी तीनवेळा विक्रमी मताधिक्याने विजय संपादित केला होता.
अजित पवार यांनी 1995 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर 91 हजार 443 मतांनी तर 1999 ला झालेल्या निवडणुकीतही त्यांनी
96 हजार 302 मतांनी तर 2009 मध्ये 1 लाख 28 हजार 544 मतांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, पंकज सिंह यांनी मात्र आता हे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. त्यांना1 लाख 79 हजार मतांनी जनतेने निवडून दिलं आहे.

 

Web Title :- BJP MLA Pankaj Singh | up election 2022 bjp candidate pankaj singh break maharashtra deputy cm ajit pawar record

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Assembly Election results 2022 | काँग्रेसच्या पराभवानंतर शरद पवारांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले …

 

Goa Assembly Result | गोव्यात भाजपचा विजय ! फडणवीसांनी विजयाचे श्रेय दिले ‘या’ दोन व्यक्तींना, स्वत:चं नाव नाही घेतलं

 

UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता, पण ओवैसींच्या AIMIM चं काय झालं? जाणून घ्या