Video : ‘हातात – तोंडात’ ४-४ पिस्तुलं घेऊन भाजप आमदाराचा ‘डिस्को’, सोशलवर आमदाराच्या ठुमक्याची ‘क्रेज’

उत्तराखंड : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील भाजप आमदार प्रणव सिंह हे नेहमीच चर्चेत असतात. ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी कोणत्याही मारहाणीच्या प्रकरणात नाही तर वेगळाच प्रकार समोर आला आहे. प्रणव सिंह यांचा दारूच्या नशेत १-२ नाहीतर ४ बंदुकांसह नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

तमंचे पर विधायक का डिस्को, 4-4 पिस्टल लहराते, ठुमके लगाते BJP के 'राणा जी'

हा व्हीडिओ कधीचा आहे हे अद्याप समजलं नाहीये. त्यामुळे आपल्या पायाचे ऑपरेशन केरुन घरी आल्यानंतर प्रणव यांनी आपल्या समर्थकांसह जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळचा हा व्हीडिओ असावा असा अंदाज लावला जात आहे. या व्हीडिओमध्ये प्रणव सिंह उत्तराखंडबद्दल अभद्र भाषेचा वापर करत आहेत. तसंच एका हातात दारूचा ग्लास आणि एका हातात ४ प्रकारच्या बंदुका घेऊन नाचत आहे. तेव्हा लांबा लांबा घूंघट काहे को डाला…. हे गाणं सुरु आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही नाचताना दिसत आहेत.

तमंचे पर विधायक का डिस्को, 4-4 पिस्टल लहराते, ठुमके लगाते BJP के 'राणा जी'

प्रणव सिंह या हत्यारांची वाहवाही करताना दिसत आहेत. तर यावेळी त्यांचे समर्थक त्यांची तारिफ करत आहेत. पूर्ण उत्तराखंडमध्ये फक्त तुम्हीच असे करू शकता, अशा शब्दात त्यांचे समर्थक त्यांचे कौतुक करत आहेत. तर त्यावर प्रणव सिंह हे गर्विष्टपणे उत्तराखंड मध्येच काय पूर्ण देशात असं कोणीच करू शकत नाही, जे मी करू शकतो, अशी उत्तर देत आहेत. तसंच यावेळी ज्या जनतेने त्यांना निवडणून दिले त्याच जनतेला शिव्या देत आहेत.

तमंचे पर विधायक का डिस्को, 4-4 पिस्टल लहराते, ठुमके लगाते BJP के 'राणा जी'

प्रणव सिंह यांना आपल्या याच वागणुकीमुळे पक्षातून निष्कासित केले आहे. त्यांचे वर्षात असे किती व्हीडिओ व्हायरल होतात हे सांगता येणार नाही. या पूर्वीही त्यांचा असा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना दिसले होते. त्या पत्रकाराने त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रारही दाखल केली होती.

तमंचे पर विधायक का डिस्को, 4-4 पिस्टल लहराते, ठुमके लगाते BJP के 'राणा जी'

दरम्यान, जूनमध्येच प्रणव सिंह यांना भाजपने तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित केले होते. तसंच त्यांच्यावर अनुशान आणि पत्रकारांविरोधातील वागणुकीबाबत कारवाई केली होती. त्यानंतर ते पक्षातील कार्यात सहभागी होताना दिसले नाहीत. मात्र त्यांचे असे व्हीडिओ व्हायरलं होण्याचे थांबले नाहीए. आता भाजप त्यांच्या या व्हीडिओवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात