भाजप आ. प्रसाद लाड ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र, भेटीबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. प्रसाद लाड अन् राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन अनेक जण कृष्णकुंज या निवास्थानी येत असतात. आता प्रसाद लाड हे राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी आमदार लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळे लाड यांची चौकशीची शक्यता आहे.

2009 साली लाड यांनी मुंबई महापालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. दरम्यान यापूर्वी भाजपचे आमदार आशिष शेलार, विनोद तावडे यांनी वेळोवेळी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले होते.