Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation संदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 29) आपली सडेतोड अन् आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी ठाकरे सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. 6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर केली जाणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला असून प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यात आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र नुसते अल्टीमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन एकत्र भूमिका मांडण्याची गरज असल्याचे मत भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

आमदार विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणा Maratha Reservation संदर्भात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:च अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची पडत आहे. सरकारमधील मंत्री जे वक्तव्य करत आहेत, त्यावरून या सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे. तसेच सकल समाजाने एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणत आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे. तसेच संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी ‌केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

निलंगेकरांचा संभाजीराजेंना पाठिंबा
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे घेतील त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे. निलंगेकर जालन्यात बोलत होते. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे डोळेझाक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजेंनी मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार