BJP MLA Rahul Kul | भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांच्या तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यावर (bhima sahakari sakhar karkhana ltd patas) जप्तीची कारवाई (confiscated) करण्यात आली आहे. राहुल कुल (BJP MLA Rahul Kul) यांच्या साखर कारखान्यावर पुणे जिल्हा बँकेचे (Pune District Bank) तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज असून ते थकीत आहे. मागील दोन वर्षापासून हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु कारखाना तीन वर्षापासून कारखाना बंद असून, पुन्हा सुरु होण्याची काहीच चिन्ह दिसत नाही. यामुळे जिल्हा बँकेने कारखान्याला नोटीस (Notice) बजावली आहे.

थकीत कर्जाची लवकरात लवकर परतफेड केली नाही तर कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी दिली आहे.
या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण बदलण्याची शक्यता आहे.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याच्या बोगस कारभाराची माहिती देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला अध्यक्षा वैशाली नागवडे उपस्थित होत्या.

थोरात यांनी सांगितले की, सन 2017-18 पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे.
त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी 36 कोटी रुपयांची मदत केली होती.
मात्र, शासनाची मदत मिळूनही कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल यांना कारखाना सुरु करु शकले नाहीत.

कारखान्याकडून बँकांची फसवणूक

कारखान्याने सभासदांसह कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांची देखील फसवणूक (Cheating) केली आहे. कायदेशीर थकहमी देत एकाच ट्रॅक्टरवर पाच-पाच बँकांकडून कर्ज घेतले आहे.
कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सातशे ट्रॅक्टरवर प्रत्येकी 40 लाख प्रमाणे 127 कोटी रुपयांचे कर्ज घेते असून हे कर्ज देखील थकीत आहे.

 

कारखान्याच्या कारभाराची चौकशीची मागणी

दौंडचे आमदार राहुल कुल व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी नुसत्या गप्पा न मारता हजारो शेतकरी व सभासदांचे हित लक्षात घेऊन साखर कारखाना सुरु करुन दाखवावा.
कुल यांच्या बोगस कारभारामुळे कामगार, शेतकरी, ग्राहक अडचणीत आले आहेत.
यासंदर्भात कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.

 

Web Title : BJP MLA Rahul Kul | daunds bjp mla rahul kuls sugar factory confiscated pune news

Pune Crime | सोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, महिलेचा विनयभंग

Female Teachers | शिक्षण विभागाच्या मुख्यालयाबाहेर 5 महिला शिक्षकांनी प्यायले विष, जाणून घ्या पूर्ण प्रकरण; पहा Video

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या