भाजपाच्या ‘या’ आमदाराचे सदस्यत्व रद्द

भंडारा : पोलीसनामा आॅनलाईन –  भंडारा जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भंडारा-साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द झाली आहे. नागपुर खंडपीठाच्या निकालानंतर भाजप आमदाराचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

पराभूत काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. काशीवार यांनी निवडणूक लढवताना शासकीय कंत्राटदार असल्याची माहिती लपविली होती. त्याचा उल्लेख आपल्या तक्रारीत केला होता. त्या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी झाली असता वाघाये यांनी सादर केलेले पुराव्यांच्या आधारावर नागपूर खंडपीठातील न्यायाधिशांच्या बेंचने आमदार काशीवार यांचे विधानसभेचे सदस्यत्व केले रद्द आहे. त्यामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे. राजेश काशीवार यांची आमदारकी रद्द झाल्याने मतदारसंघासह भंडारा जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर खंडपीठानं काशीवार यांची आमदारकी रद्द केलीय. काशीवार यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी आणि चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले व विश्वस्त हिंदकेसरी योगेश दोडके यांना न्यायालयाचा दणका

‘या’ कारणामुळे पंकजा मुंडे यांनी दिली फेसबुक कार्यालयास भेट 

मुंबई : सर्वांना घरे हे मिशन पूर्ण करण्यासाठी  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बचत गटाच्या महिलांना घेऊन थेट सॅन फ्रान्सिस्को येथील फेसबुक कार्यालयास भेट दिली. २०२२ पर्यंत सर्वांना घरे हे मिशन पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जगप्रसिद्ध अशा वेगा बिल्डींग सिस्टिम कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या कंपनीने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडणाऱ्या किंमतीत घरे बांधण्याबाबत मुंडेंनी चर्चा झाली. तसेच भारतातही लवकरच हा प्रयोग सुरू केला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी बचत गटाच्या महिला प्रतिनिधांना घेऊन फेसबुकचे कार्यालय गाठले. अमेरिकेतील नामांकित उद्योगांना भेटी दिल्या. या दौऱ्या पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅलीतील फेसबुक कंपनीला भेट दिली. यावेळी, बचत गटाच्या सर्व महिला आपले अनुभव मांडायला, उत्पादने जागतिक स्तरावर दाखवायला अत्यंत उत्सुक होत्या. फेसबुक, व्हाट्सअपच्या प्रतिनिधिंशी आम्ही प्रथम राज्यामध्ये कार्यरत असलेल्या विविध योजनांबद्दल चर्चा केली आणि त्यांना महाराष्ट्रात कशापद्धतीने महिलांकडून उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, याची माहिती दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.