‘मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत ? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांनी सावरकर सभागृहातून (Savarkar Sabhagruha)भाषण केलं. परंतु त्यांच्या भाषणात सावरकरांबद्दल एकही शब्द नव्हता. बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी अशी टीका करत भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)यांनी सीएम उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Dasra Melava) भाषण करताना विरोधकांचा समाचार घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून बोलतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यानंतर आता भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर पलटवार करायला सुरुवात केली आहे. राम कदम यांनीही ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला.

राम कदम म्हणाले, “शिवसेनेनं सावरकर सभागृहात दसरा मेळाव्याचं आयोजन करून हिंदुत्वाबद्दलचे धडे दिले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका शब्दानंही सावरकरांची (Vinayak Damodar Savarkar)प्रशंसा का केली नाही हा प्रश्न आहे. बहुधा ते आपल्या नव्या मित्रांना घाबरत असावेत. त्यांचे नवे मित्र सावरकरांबद्दल वारंवार अपमानास्पद विधानं करतात” असंही कदम म्हणाले.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye ) यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. अनेक वर्षे हिंदुत्वासी तडजोड नाही अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. परंतु ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसनं टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावं लागलं हाच काळाचा न्याय आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

You might also like