भाजपच्या ‘या’ आमदारानं अर्थमंत्र्यांना सुचविला ‘तोडगा’, होणार ‘ब्लॅक मनी’ चा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीएसटीमुळे महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे देशाची तिजोरी रिकामी झाली असल्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे केंद्र सरकारला आरबीआयकडून पैसे घ्यावे लागत आहेत. त्यामुळेच देशातील भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्यांसह इतर कंपन्याही विकायला काढल्या आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पेशाने डॉक्टर असलेल्या गोरखपूरच्या भाजपा आमदाराने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक तोडगा सुचविला आहे. त्यांनी याबाबत माहिती फेसबुक वर देखील पोस्ट केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा संपविण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यांनी काळा पैसा बाहेर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येईल असे देखील आश्वासन दिले होते. तसेच आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांना धारेवर धरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. तसेच स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन भाजपा सरकार काही पूर्ण करू शकले नाही.
Radha Mohan Das Agrawal

भाजपा सरकाने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांनी नोटबंदी केली परंतु मोदी सरकारचा हा देखील प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर जीएसटी लागू केल्याने भारतीय अर्थव्यस्थेचे कंबरडे मोडल्याचा आरोप विरोधकांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा सरकार अपयशी ठरत असल्याने गोरखपूरचे भाजपा आमदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी आयकरच बंद करण्याचा उपाय सुचविला आहे.

खोलवर जाऊन विचार केला तर निदर्शनात येईल की आर्थिक मंदीचे मूळ कारण मागणीत घट झाली हेच आहे. कारण जोपर्यंत बाजारात खरेदीची संख्या वाढत नाही, तोपर्यंत उत्पादक माल बनविणार तरी कुणासाठी ? त्यामुळे साहजिकच तो त्याच्या पैशांचा वापर माल बनविण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी करेल ? आणि नेमके हेच झाले आहे. तसेच जेव्हा लोकांच्या मनातून दोन नंबरचा पैसा पाप असतो, हे ओझे संपून जाईल तेव्हा ते पैसे बँकेत ठेवतील किंवा त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वस्तू खरेदी करतील. त्यांच्याकडे पैसा आहे पण तो एक नंबरचा नाहीय, अशी पोस्ट डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी केली.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like