BJP MLA Santosh Danve | ‘अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी अब्दुल सत्तारांनी मदत केली’; भाजपा आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Santosh Danve | भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील सहाव्या जागेच्या चुरशीच्या लढतीत अखेर भाजपने आपली बाजी मारली आहे. शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभवाचा धक्का देत भाजपचे धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) आपल्या विजयाची कमान रोवली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. तसेच, काही अपक्षांवर देखील निशाणा साधला. यानंतर अपक्ष आमदारांनी नाराजी दर्शवली. अशातच भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी (Shivsena Minister Abdul Sattar) राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) आम्हाला मदत केली असा दावा आमदार संतोष दानवे (BJP MLA Santosh Danve) यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी असं संतोष दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

त्याचबरोबर, “अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
सत्तार हे निश्चितपणे ज्या पक्षात असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.
तसेच, “अब्दुल सत्तार यांनी 100 टक्के आम्हाला मदत केली आहे.
त्यांचे तोंडच असे आहे की ते बाजारात कोण कुठे गेले आणि कोण कुठे चालले आहे हे बघत फिरत असतात.
अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळत असते.
हीच मदत आम्हाला विधान परिषदेसाठी अपेक्षित आहे आणि तंतोतंत ते याचे पालन करतील,” असं देखील दानवेंनी म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP MLA Santosh Danve | shivsena minister abdul sattar helped to get independent mlas along bjp mla santosh danve claims

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा