राहुल गांधी रावण, तर प्रियांका गांधी शुर्पनखा : भाजप आमदार

बलिया : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. त्यात भाजप आणि विरोधकांच्या एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात आता उत्तर प्रदेशमधील सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे रावण आहेत. तर त्यांची बहिण नवनियुक्त महासचिव प्रियांका गांधी या शूर्पणखा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. असं वक्तव्य करताना त्यांना हे भान नसावे ते कुठे बोलत आहेत. त्यांनी हे वक्तव्य चक्क एका पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

काँग्रेसमध्ये रावणाची संस्कृती असून प्रजातांत्रिक युद्ध लढण्याचा आरोप लावला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची तुलना रावण आणि प्रियांका गांधी या शुर्पनखा या रामायनातील पात्रांशी केली आहे. रावणाने जसे रामासोबतच्या युद्धावेळी शूर्पणखेला पाठवले होते, तसेच राहुल यांनी बहिण प्रियंका हिला पाठविले आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले.

राहुल यांनी प्रियंका यांच्याकडे नेतृत्व देऊन आपले अपयश मान्य केल आहे. तसंच काँग्रेस आता राहुल यांचा भावोजी रॉबर्ट वड्रा यांना राजकारणात आणू शकते. बाटली आणि हॉटेल संस्कृतीला काँग्रेस पोषक आहे, असं आरोप सुरेंद्र सिंह यांनी केले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट रामाशी केली आणि तेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.