BJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे स्पष्टीकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भाजपचे पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे समोर आलं. भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip goes viral) झाली. पण ती ऑडिओ क्लिप माझी नाहीच, त्यात असणारा आवाज सुद्धा माझा नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुनिल कांबळे यांनी दिलं आहे.

आमदार सुनिल कांबळे म्हणाले, जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे ती माझी नाही. आगामी निवडणूक (Election) डोळ्यासमोर ठेवून माझी बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज (Voice) माझा नाही. हे विरोधकांचे षडयंत्र आहे, असे कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी सांगितले.

कांबळे पुढे म्हणाले, व्हायरल करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज मागे पुढे करण्यात आला आहे.
गेल्या 25 वर्षामध्ये मी सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे विरोधकांना हे जड जात आहे.
त्यामुळे माझ्याविरोधात हे कटकारस्थान आहे, असा दावा त्यांनी केला.

पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), महापौर आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याशी बोलणं झालं आहे.
हा भाजपच्या (BJP) विरोधात रचलेला कट आहे. गेल्या 25 वर्षांत ज्यांना काम जमले नाही ते काम आम्ही केलं आहे,
त्यामुळे अशी क्लिप व्हायरल केली असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. तसेच या क्लिप विरोधात मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे.
पोलिसांनी माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करवी, अशी मागणी देखील सुनील कांबळे यांनी पुणे पोलिसांकडे (Pune Police) केली आहे.

Web Title :- BJP MLA Sunil Kamble | i will not apologize explanation of bjp mlas sunil kamble on insulted women officers audio clip pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला नकार देणे बलात्कार नाही – मुंबई हायकोर्ट

Lung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 134 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी