BJP MLA Sunil Kamble | ‘त्या’ व्हायरल क्लिपची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू; पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MLA Sunil Kamble | गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या (Pune Corporation) मलनिस्सारण विभागातील रखडलेले बील काढण्यावरून भाजप आमदार व नगरसेवक सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी महिला अभियंत्यास व इतर दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. अखेर या कथित क्लिपच्या चौकशीस पुणे पोलिसांनी (Pune Police) सुरुवात केली आहे. पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नुकताच बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police Station) नोंदवला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या इतरांचे देखील जबाब लवकरच नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आमदार सुनिल कांबळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

या क्लिपमध्ये ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर हा फोन आला होता त्यामध्ये तो तो व्यक्ती आ. कांबळे बोलत आहेत, असे म्हणत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
ही क्लिप व्हायरल होताच राष्ट्रवादीने आमदार कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन केले.
इतकेच नाहीत तर राजकीय संघटनांनी महापालिकेसमोर आंदोलने केली.
तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागल्याने क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा खुलासा आमदार कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांनी केला.
तसेच या क्लिपची पोलीस चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

 

बंडगार्डन पोलीस ठाण्यात पीडित महिला अधिकार्‍याचा नुकताच जबाब नोंदवण्यात आला.
तसेच क्लिपमध्ये उल्लेख असलेले इतर दोन अधिकारी, ज्याच्या मोबाईलवर फोन आला होता तो व्यक्ती,
ज्याच्या मोबाईलवरून फोन आला होता. त्या व्यक्तीसह आ. कांबळे यांचाही जबाब टप्प्या टप्प्याने नोंदवण्यात येणार आहे.

 

Web Title :- BJP MLA Sunil Kamble | Pune police starts investigation into that viral clip regarding pune corporation lady officer; The victim recorded the reply of the PMC female officer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Band | ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Power Crisis In Maharashtra | चिंताजनक ! महाराष्ट्रावर कोळसा टंचाईचे संकट ‘गडद’, कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच बंद

BJP MLA Gopichand Padalkar | ‘रोखठोक’ वरून पडळकरांचा निशाणा, म्हणाले – ‘संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय’