उन्नाव रेप केस प्रकरणातील आरोपीचे भाजपा आमदाराकडून ‘समर्थन’ !

लखनौ : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील आमदार कुलदीप सिंह सेंगर याला भाजपने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही भाजपाचे एक आमदार त्याचे समर्थनासाठी पुढे आले आहेत. दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडिताच्या कारला धडक देऊन पळून गेलेल्या ट्रकचालकाला सीबीआयने अटक केली आहे.

हरदोई येथील आमदार आशीष सिंह आशु असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी कुलदीप सिंह सेंगर यांचे समर्थन केले. एका कार्यक्रमात ते म्हणाले, आपले भाई कुलदीप सिंह सेंगर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. आमच्या शुभकामना त्यांच्याबरोबर आहे. ते लवकरच या कठीण परिस्थितीतून बाहेर येतील.

उन्नाव बलात्कार प्रकरणात पिडिताच्या कारला धडक देऊन तिचा मृत्यु घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेंगर व इतरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २ वर्षानंतर भाजपाने कुलदीप सिंह सेंगर याची पक्षातून हकालपट्टी केली. असे असताना भाजपाचेच आमदार त्यांचे समर्थन करण्यासाठी पुढे आला आहे.

दरम्यान, पिडिताच्या सरंक्षणासाठी नियुक्त केलेल्या ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी हे तिघेही त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –