कुटुंबियांनी मुलींना चांगले संस्कार द्यावेत, तेव्हाच थांबतील रेपच्या घटना : भाजपा आमदार

लखनऊ : भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी रेपच्या घटनांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बलियाच्या बेरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटले की, सर्व आई-वडीलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यावेत, तेव्हाच रेपच्या घटना थांबतील. या आमदाराला हाथरस कांडवर प्रतिक्रिया मागितली असता, ही प्रतिक्रिया त्याने दिली.

सुरेंद्र सिंह यांना एका पत्रकारांने प्रश्न विचारला की, हे रामराज्य सुरू आहे. या रामराज्यात रेपसारख्या घटना रोज घडत आहेत. याचे कारण काय.

यावर सुरेंद्र सिंह यांनी म्हटले की, मी आमदारासह एक शिक्षक आहे. या घटना संस्कारानेच थांबू शकतात. शासन आणि तलवारीने थांबणार नाहीत. सर्व आई-वडिलांनी आपल्या मुलींना एका संस्कारी वातावरणात राहाणे, चालणे आणि शालीन व्यवहार करण्याची पद्धत शिकवावी.

भाजपा आमदाराने म्हटले की, हा सर्वांचा धर्म आहे. सरकार आणि कुटुंबिय दोघांचा. जर सरकारचा संरक्षण करण्याचा धर्म आहे, तर कुटुंबियांचाही धर्म आहे की, त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. सरकार आणि संस्कार मिळून भारताला एक सुंदर रूप देऊ शकतात.

हाथरस कांडचा विरोध करत असलेल्या सपा, बसपा आणि काँग्रेसवर निशाणा साधताना हे आमदार म्हणाले, हे लोक राजकीय फायद्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. दलित असो, की ब्राह्मण असो, सर्वांची मुलगी ही मुलगीच असते. सर्वांनाच सुरक्षा मिळाली पाहिजे. परंतु, विरोधी पक्ष आपल्या फायद्यासाठी दलित मुलगी म्हणत समाज विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लाख प्रयत्न केले तरी उत्तर प्रदेशच्या जमीनीवर काँग्रेस मजबूत होणार नाही.