BJP MLA Suspension Revoked | अखेर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (Maharashtra Assembly Monsoon Session) विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळ याप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन (BJP MLA Suspension Revoked) केले होते. हा मुद्दा मागील काही महिन्यापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. अखेर निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन (BJP MLA Suspension Revoked) मागे घेण्यात आले आहे.

 

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन (BJP 12 MLA Suspension) हे कायदेशीर (Legal) नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर राज्य सरकारवर (State Government) दबाव वाढू लागला होता. अखेर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात 28 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याबाबत महत्त्वाचा निकाल दिला होता. यामध्ये 12 आमदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली होती. (BJP MLA Suspension Revoked)

 

आमदारांविरोधात 60 दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची करावाई करण्याचा विधानसभेला अधिकार नाही. परंतु भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. वर्षभर निलंबित करणे ही लोकप्रतिनिधीच्या हाकालपट्टीपेक्षाही गंभीर शिक्षा म्हणावी लागेल, असे ताशेरे न्यायालयाने गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत (Hearing) ओढले होते.

तीन सदस्यीय खंडपीठाने दिला निर्णय
राज्य विधिमंडळाच्या 2021 मधील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई पावसाळी अधिवेशनापुरतीच मर्यादित असायला हवी होती. अधिवेशनाचा कालावधी संपल्यानंतरही निलंबन कायम ठेवण्याचा विधानसभेतील ठराव घटनाबाह्य, बेकायदा आणि विधानसभेच्या अधिकाराच्या मर्यादा भंग करणारा होता, अशी टिप्पणी न्या. ए.एम. खानविलकर (Justice. A.M. Khanwilkar), न्या. दिनेश माहेश्वरी (Justice. Dinesh Maheshwari) आणि न्या. सी.टी. रवीकुमार (Justice. C.T. Ravi Kumar) यांच्या तीन सदस्यांच्या पीठाने केली आणि भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले.

 

12 आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव
विधानसभेत 5 जुलै 2021 रोजी ठराव संमत करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. त्याविरोधात आशीष शेलार यांच्यासह अन्य निलंबित आमदारांच्या वतीने या ठरावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

 

निलंबन झालेल्या आमदारांची नावे

 

1. गिरीश महाजन (Girish Mahajan), जामनेर, जळगाव

2. आशिष शेलार (Ashish Shelar), वांद्रे पश्चिम

3. डॉ. संजय कुटे (Dr. Sanjay Kute), जळगाव जामोद

4. अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar), औसा, लातूर

5. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), कांदिवली पूर्व, मुंबई

6. पराग अळवणी (Parag Alvani), विलेपार्ले, मुंबई

7. राम सातपुते (Ram Satpute), माळशिरस, सोलापूर

8. हरीश पिंपळे (Harish Pimple), मूर्तिजापुर, अकोला

9. जयकुमार रावल (Jayakumar Rawal), सिंदखेडा, धुळे

10. योगेश सागर (Yogesh Sagar), चारकोप, मुंबई

11. कीर्तिकुमार भांगडिया (Kirtikumar Bhangdiya), चिमूर, चंद्रपूर

12. नारायण कुचे (Narayan Kuche), बदनापूर, जालना

काय आहे प्रकरण?
पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा (OBC reservation) ठराव मांडला. मात्र, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गदारोळ केला. एवढंच नाही तर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), अनिल परब (Anil Parab) यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

Web Title :- BJP MLA Suspension Revoked | bjp mla suspension revoked by maharashtra government after supreme court orders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदने ब्लाऊजशिवाय साडी नेसून दाखवल्या बोल्ड अदा; चाहतेही थक्क

 

Aurangabad News | काय सागंताय ! होय, चक्क भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा

 

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी