कार्यकर्त्यांच्या ‘चालान’साठी भाजपा आमदार आले रस्त्यावर, होमगार्डला मारहाण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा किंवा कोणीही आमदार काही काम करत नसल्याचा, जनतेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वारंवार होत असतात. मात्र, काही आमदार इतके तत्पर असतात की काही झाले की ते तात्काळ ते पोहचतात. ट्रिपल सीट जाणाऱ्या कार्यकर्त्यावर चालान केले जात असल्याचे समजताच भाजपाचे आमदार चक्क चौकात धावून गेले. आपल्या कार्यकर्त्यांवर चालान केल्याच्या कारणावरुन भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी एका होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना वणी येथील टिळक चौकात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश बोढे हे होमगार्ड जवान आपल्या सहकाऱ्यांसह टिळक चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरुन तिघे जण येत असल्याचे पाहून त्यांनी मोटारसायकल अडविली. त्यांना चालान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघांपैकी एकाने थेट आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना फोन करुन आपल्यावर चालान केले जात असल्याची माहिती दिली. हे समजल्यावर आमदार साहेब थेट टिळक चौकात आले. त्यावेळी चालान करणारे होमगार्ड खाकी शर्टच्यावर आणखी पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून होता.

त्यामुळे आमदारांनी त्याचा हात पकडून वर्दीबाबत विचारणा केली. इतक्या मोठ्या रक्कमेचे चालान का फाडत आहे. या घटनेनंतर होमगार्ड वणी वाहतूक शाखेत पोहचला. त्यामुळे बघ्याची एकच गर्दी झाली होती. होमगार्ड प्रकाश बोढे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला तर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपण टिळक चौकात पोहचलो. तेव्हा संबंधित होमगार्ड साध्या वेशात चालान फाडत होता. त्यामुळे आपण केवळ त्याचा हात पकडून समज दिली. होमगार्डच्या गणवेशात राहून ड्युटी करा, असे बजावून सांगितले. मारहाण केली नसल्याचा त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like