Chandrakant Patil | एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला टोला लगावत म्हटलं की, भाजपच्या आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे. खडसें यांच्या या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी उत्तर दिलय. भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील (chandrkant patil) हे पुण्यात बोलत होते.

Gold Rates | सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ होणार, जाणून घ्या

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहेत.
तिकडे गेल्यानंतर तरी त्यांनी खरं बोलावं.
मागील दीड वर्षांमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली.
पंढरपूरही जिंकले. आम्ही काही अस्वस्थत नाही, असे चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी म्हटले आहे.
तसेच आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे, असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते खडसे ?
भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं. म्हणून ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात. ही नाराजी वाढू नये म्हणून सरकार पडण्याची वक्तव्ये केली जात असतील. देवेंद्र फडणवीस हे आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी अस्वस्थतेतूनच अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. चंद्रकांत पाटलांनी याआधी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. परंतु, काहीही होत नाही. उलट दिवसेंदिवस हे सरकार मजबूत होत आहे. विरोधक वाट बघत आहे आणि ते वाटच बघत राहतील. असे भाष्य एकनाथ खडसे यांनी केले होतं.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय