BJP MNS Alliance | मोठी बातमी ! भाजप-मनसे युतीची घोषणा ‘या’ तारखेला होण्याच्या शक्यतेची जोरदार चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे (BJP And MNS) युती होणार असल्याची मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. यावरुन अनेकांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या. दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येत आहे. भाजप-मनसे युतीला (BJP MNS Alliance) संघाने (RSS) हिरवा कंदिल दाखवल्याने युती होण्याची शक्यता आहे.

 

मागील काही दिवसामध्ये भाजप आणि मनसेची (BJP MNS Alliance) जवळीक वाढते आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. मनसेने भोंग्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. 3 मे पर्यंत भोंग्यावरुन राज्य सरकारला (Maharashtra State Government) अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे. मनसेच्या याच भुमिकेला भाजपनेही पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळामध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं समजते.

 

दरम्यान, आगामी 5 जूनला राज ठाकरे अयोध्या (Ayodhya) दौरा करणार आहेत.
त्यानंतर 6 जूनला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, 14 जूनला युतीची औपचारिक घोषणा होईल. अशी माहिती सूत्रांकडून दिली आहे.

 

Web Title :- BJP MNS Alliance | maharashra politics bjp mns alliance to be announced on 14 june

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Navneet Rana – MLA Ravi Rana | राणा दाम्पत्यानं केली न्यायालयास विनंती, म्हणाले – ‘आम्हाला घरचं जेवण द्या, खाण्याची आबळ होतेय’

 

Manisha Kayande on Raj Thackeray | ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…’; मनीषा कायंदेंची राज ठाकरेंवर टीका!

 

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी