BJP-MNS Alliance | पुण्यात भाजप आणि मनसे युतीचं वारं ?; चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – BJP-MNS Alliance | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा यावरुन राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच मनसे राज्यभर चर्चेत येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी मनसे आणि भाजप युतीची (BJP-MNS Alliance) चर्चा रंगली होती. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपने दिलेला पाठिंबा आणि आता सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निवडणूकीबाबतच्या आदेशानंतर पुन्हा युतीची चर्चा जोर धरत आहे.

 

महापालिका निवडणूकांची (Municipal Elections) 2 महिन्यांपूर्वी चर्चा सुरू झाली. त्यावेळी मनसे राजकीय दृष्ट्या एकदम पिछाडीवर होती. त्यांचा कोणी विचार देखील करत नव्हते. खुद्द त्या पक्षाचे स्थानिक नेतेही संभ्रमात होते. परंतु, आता राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलल्यानंतर मात्र मनसे चर्चेत आली आहे. त्यातच राज ठाकरे यांना मनसेकडून हिंदूजननायक म्हणून जाहीरपणे पुढे आणले जात आहे. त्यामुळेच चर्चेला जोर लागला आहे. त्यातच आता ही युती झाली तर काय – काय होऊ शकते याचे आडाखे विरोधातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांकडून मांडले जाताहेत. (BJP-MNS Alliance)

सध्या भाजप आणि शिवसेना (BJP And Shivsena) याच्यात मोठं राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसतं.
भाजप एकटी असतानाच आता त्यांना मनसेची ताकद मिळाली आहे.
त्यामुळेच महापालिका निवडणुकीत आणि विशेष म्हणजे पुण्यात (Pune Municipal Election) मनसे – भाजपा यांची युती होईल का ? या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
काही दिवसापुर्वी मनसैनिकांकडून याचा निर्णय राज ठाकरे घेतील असे सांगण्यात येते.
तर भाजपातही वरिष्ठ स्तरावरच याबाबत निर्णय होईल, असं म्हटलं जात आहे.
परंतु दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा ही युती व्हावी अशीच असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, ”भाजप आणि मनसे युतीमुळे विशेष राजकीय फरक पडेल असे वाटत नाही.
हिंदुत्वाचा मुद्दा कितीही ताणला तरीही या दोन्ही पक्षांना अखेर व विकासाच्या मुद्द्यावरच यावे लागले,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी मांडलं आहे.

 

 

Web Title :- BJP-MNS Alliance | what about bpj mns alliance will it happen or not in pmc election

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा