BJP Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; नवाब मलिकांच्या अटकेनंतर केलेलं कृत्य पडलं महागात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Mohit Kamboj | मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची बुधवारी ८ तास चौकशी केल्यानंतर ED ने त्यांना अटक केली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) त्यांना ८ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. या घडामोडी सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. दरम्यान, मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज (BJP Mohit Kamboj) यांनी जल्लोष केला. कंबोज यांच्या घराजवळ काही कार्यकर्ते जमले होते. जल्लोष करत असताना त्यांनी म्यानातून तलवार काढली. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी (Santacruz Police Station) कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते मोहित कंबोज (BJP Mohit Kamboj) यांच्यातील वाद काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी क्रुझ ड्रग्स पार्टीवर धाड टाकल्यानंतर एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात मलिक यांनी मोर्चा उघडला होता. एका पत्रकार परिषदेत मलिक यांनी कंबोज यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांच्या बेनामी संपत्ती आणि ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते. दोघांनीही ट्विटरच्या माध्यमातून शेरोशायरी करत एकमेकांची उणिधुनी काढली होती. तसेच कंबोज यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक म्हणजे राजकारणातील सलीम – जावेद जोडी असल्याचा टोलाही लगावला होता.

ईडीने नवाब मलिक यांना अटक केली त्यानंतर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मलिक यांच्या अटकेचा मोहित कंबोज यांना इतका आनंद झाला की, त्यांनी मलिकांविरोधात घोषणाबाजी करत तलवार म्यानातून उपसली होती.
या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला.

 

Web Title :- BJP Mohit Kamboj | nawab malik bjp leader mohit kamboj charged fir after maliks arrest was show the sword

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा