कर्जमाफीबद्दल BJP खा. भारती पवारांनी संसदेत मानले CM फडणवीसांचे आभार ! खा. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभेत आभार मानले. पवार यांनी आभार मानताच भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू फुटले. यासंबंधी व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये डॉ. भारती पवार बोलताना दिसून येत आहेत तर त्यांच्या पाठीमागील बाकावर बसलेल्या भाजप खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे बाकाखाली डोके लपवून हसताना दिसत आहेत

या व्हिडिओचा दाखला देऊन सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत. लोकसभेत ही घटना घडली. संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात जनतेने निवडून दिलेले खासदार आपआपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या मांडत आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐनवेळी दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांचा पराभव करत डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like