‘GDP’ म्हणजे ‘बायबल’ – ‘रामायण’ नाही, भाजपच्या ‘या’ खासदारानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या जीडीपी बद्दल अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्ती केली जात असताना एका भाजप नेत्यांने मुक्ताफळं उधळली आहेत. देशाचा जीडीपी 4.5 टक्क्यांवर आला आहे, भाजपला आता विरोधकांना, उद्योगपतींना उत्तरं द्यावी लागत आहे आणि आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवर मोठे भाष्य केले. भाजप खासदाराच्या या विधानामुळे आता भाजप पुढील अडचणी वाढणार आहे.

जीडीपी काय रामायण नाही
भाजप खासदार म्हणाले की जीडीपी ही संकल्पना 1934 मध्ये आली. याआधी GDP नव्हताच. त्यामुळे GDP म्हणजेच आर्थिक विकास दर हे काही बायबल, रामायण, महाभारत नाही. भविष्यातही जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही. सामान्य माणसाचे सतत आर्थिक कल्याण होते की नाही हे महत्त्वाचे आहे. GDP पेक्षाही विकास महत्त्वाचा आहे असे मत त्यांनी मांडले.

अर्थमंत्र्यांवर टीका
भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतू उपयोग होताना दिसत नाही. वैयक्तिक गुंतवणूक कमी झाल्यामुळे आर्थिक विकास दर 4.5 टक्के इतका खाली आला. मागील 6 वर्षांतील हा निचांकीचा दर आहे. काँग्रेसच्या अधीररंजन चौधरी यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख निर्बला सीतारामन असा केला. देश आर्थिक संकटात असताना, बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना राजकीय नेते मंडळीमात्र फक्त टीका करण्यात व्यस्त आहेत.

Visit : policenama.com