भाजपच्या ‘या’ खासदाराच्या गळयात लोकसभा अध्यक्षाची ‘माळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ओम बिर्ला राजस्थानातील कोटा मतदार संघातून लोकसभा सदस्य आहेत.

लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत ओम बिर्ला यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार ही नवे शर्यतीत होती. मात्र एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवार जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी आज आपला अर्ज दाखल करतील. लोकसभेत एनडीए बहुमत असल्यामुळे ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष बनतील.