भाजप खासदारानं रोड-शो दरम्यान माइक चालू असतानाच सीपींना केला ‘कॉल’, म्हणाले – ‘ओवैसी तुमचं डिपार्टमेंट चालवतो का ?’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या निजामाबादचे भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका रोड शो दरम्यान माइक ऑन करुन कमिश्नरवर फोनवर बोलत होते. ते निजामाबादच्या राज्य भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये गिनले जाणारे राजा सिंह यांच्या कार्यक्रमासंबंधित कमिश्नरकडून मिळालेल्या निर्देशामुळे नाराज दिसत होते.

ते फोनवर बोलताना म्हणाले की, ओवैसी चालवत होते का तुमचे डिपार्टमेंट तेलंगणामधून भाजपला काढून टाका ? हाच ठेका पोलिसांनी घेतला आहे का ? ते कमिश्नरला म्हणाले की, तुम्ही जसे सांगाल तसे भाजप वागणार नाही, राजा सिंह यांना तुम्ही निवडणूकीचा प्रचार करण्यापासून रोखू शकत नाहीत ? ओवैसी किती वाजता निजामाबादला येत आहेत ?

यापुढे खासदार म्हणाले की, राजा सिंह आले तर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था समजते, ओवैसी येईल तेव्हा येत नाही, तुमच्यासाठी राजा सिंहजी यांचा मार्ग बदलला आहे, त्यापेक्षा जास्त आम्ही काही करु शकत नाही.

लोक म्हणाले दक्षिणेचा योगी –
या व्हिडीओनंतर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशाल चक्रवर्ती नावाच्या एका ट्विटर यूजरने तर त्यांना दक्षिण चे योगी असेही म्हणले. अनेकांनी कमिश्नरशी बोलण्याच्या पद्धतीवर टीका केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/