भाजपा खासदार गौतम गंभीरनं गरजू लोकांसाठी केलं ‘हे’ मोठं काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपा खासदार गौतम गंभीर ’जन रसोई’ भोजनालय सुरुकरणार आहे, ज्यामध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात गरजू लोकांना एक रुपयात दुपारचे जेवण दिले जाईल. याबाबत गंभीरच्या कार्यालयाने सांगितले की, ते गुरुवारी गांधी नगरमध्ये पहिली जनरसोई सुरू करतील, ज्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्ये सुद्धा असेच भोजनालय सुरू करण्यात येईल.

भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी म्हटले, माझे नेहमी असेच मत आहे की, सर्व जाती, धर्म आणि आर्थिक स्थिती बिकट असणार्‍या सर्वांना हेल्दी आणि स्वच्छ जेवण करण्याचा अधिकार आहे. हे पाहून वाईट वाटते की, बेघर आणि निराधार लोकांना दिवसात दोन वेळची भाकरी सुद्धा नशीबात नसते.

गंभीरने सांगितला प्लॅन
याशिवाय खासदार सांसद गौतम गंभीरने पूर्व दिल्लीच्या दहा विधानसभा मतदारसंघात ’जन रसोई’ भोजनालय उघडण्याची योजना आखली आहे. गंभीरच्या कार्यालयाकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, देशातील सर्वात मोठ्या घाऊक कपडा बाजारापैकी एक असलेल्या गांधी नगरमध्ये उघडण्यात येणारे भोजनालय पूर्णपणे आधुनिक असेल, ज्यामध्ये गरजूंना एक रुपयात भोजन उपलब्ध करून दिले जाईल.

एकावेळी 100 लोकांना मिळेल जेवण
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या जन रसोई भोजनालयात एकावेळी 100 लोकांना बसण्याची व्यवस्था असेल. परंतु, कोविड-19 महामारीमुळे केवळ 50 लोकांनाच बसण्याची परवानगी असेल. दुपारच्या जेवणात भात, डाळ आणि भाजी दिली जाईल. या योजनेला अर्थपुरवडा गौतम गंभीर फाऊंडेशन आणि खासदारांच्या खासगी स्त्रोतातून केला जाईल. जन रसोईसाठी सरकारची मदत घेतली जाणार नाही.