Lockdown Again : ‘हम करे सो कायदा’, हे बरोबर नाही : खा. गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. ‘पालकमंत्री अजित पवार यांनी केवळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकप्रतिनिधी यांना विश्‍वासात घेतले नाही. “हम करे सो कायदा” असून हे बरोबर नाही. केवळ चार टक्के बाधित रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेतले तर ‘काय करायचं हे आम्ही ठरवू’, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला.

‘कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करायला पाहिजेत. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी होऊ शकते. मात्र, त्यांना विश्वासात घेत नाहीत. केवळ दिवस पुढे ढकलल्याने संख्या कमी होणार नाही, सर्व पुणे शहराला वेठीस धरले जातेय’, असेही बापट म्हणाले.

‘या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारने बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिले नाही. यामुळे उपासमारीची भीती असून सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे’,

‘लॉकडाउन जाहीर करताना खासदार, आमदार यांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवले, त्यांचा सल्ला घेतला. मात्र, तसं पुण्यात होत नाही, मनमानी कारभार होत आहे, असाही आरोप बापट यांनी केला.

यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोकं ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाई करा. मात्र, दैनंदिन जीवन विस्कळीत होतय. जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचे आहे, असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा गिरीश बापट यांनी दिला.