भाजप खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त सूत्रांकडून समजते आहे. गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी गोपाळ शेट्टी यांचा चांगलाच समाचार घेतला होता . त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी त्यामुळेच राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad831f9e-80f3-11e8-af2a-73407af52ebd’]
याबाबत बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले की, मला कोणत्याही पदापेक्षा वाणी स्वातंत्र्य, बोलण्याचे  स्वातंत्र्य महत्त्वाचे  आणि प्रिय आहे. पक्षाने सांगण्याअगोदर मी दुपारी एक वाजेपर्यंत निर्णय जाहीर करेन. पक्षाने कारवाई करण्याची वाट पाहणार नाही, असे  गोपाळ शेट्टी म्हणाले. पक्षातील वादापेक्षा वाणीस्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे आहे. वाणीस्वातंत्र्यावर गदा आणणारे  पद मला नको. त्यामुळे मी आज एक वाजता निर्णय घेणार आहे, असे  गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

काय आहे गोपाळ शेट्टी यांचे ख्रिश्चनांबाबतचे वक्तव्य

भारतातील ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश होते, त्यामुळे  त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नव्हता असे  वक्तव्य खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे. याबाबतचा त्यांचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या मालवणीत शिया कब्रस्तान कमिटीमार्फत आयोजित एका कार्यक्रमात शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र लढले. दोन्ही समुदायांनी मिळून भारत स्वतंत्र केला. स्वातंत्र्य लढ्यात कोणी हिंदू-मुस्लिम म्हणून नव्हे तर हिंदुस्थानी म्हणून लढले, असे  सांगतानाच त्यांनी दोन्ही समुदायावर स्तुतीसुमनं उधळली. दरम्यान दोन व्यक्तींनी खासदार शेट्टी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.