BJP MP Heena Gavit | ‘घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  BJP MP Heena Gavit | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आल्यापासून आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात अनेक कारणावरुन आरोपांच्या फैरी झडत असतात. अशातच भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित (BJP MP Heena Gavit) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) हल्लाबोल केला आहे. ‘घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोना विरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला,’ असा घणाघात गावित यांनी केला आहे.

 

माध्यमांशी बोलताना हीना गावित (BJP MP Heena Gavit) म्हणाल्या की, ‘प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे (Central Government)
बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकार कोरोना काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलीय.
तसेच, कोरोना काळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे,’ असं टिकास्त्र त्यांनी सोडलं आहे.

 

पुढे त्या म्हणाल्या. ‘कोरोना काळात महाराष्ट्रात मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरु होती.
भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली.
केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळाल्यानंतरही भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली. पण, सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करून घेतली.

आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या 2 हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या, याचा हिशेब जनतेस द्या.
कोरोना काळात जेव्हा महाराष्ट्रातील जनता आर्थिक संकटामुळे हतबल झाली होती.
तेव्हा ठाकरे सरकारचे मंत्री मात्र भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीतून कोट्यवधींचा मलिदा उकळत होते.
सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळेच जनतेकडे दुर्लक्ष झाल्याची टीका देखील गावित यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

 

दरम्यान, गावित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे.
‘कोरोना संकटाच्या कालावधीत मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि जनतेला वाऱ्यावर सोडले.
तसेच गंभीर संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली.
या अपयशास ‘मी जबाबदार’ असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी’,
असा बेजबाबदार बाणाही दाखविला, असं गावित यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : BJP MP Heena Gavit | bjp heena gavit slams uddhav thackeray govt over corona situation issue maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Fire | महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन फटून आग, मोठा अनर्थ टळला

Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा

ST Workers Strike | ‘भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी’