BJP MP Join TMC | भाजपला मोठा धक्का ! मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री राहिलेल्या BJP खासदाराचा TMC मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था BJP MP Join TMC | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिलेले भाजप खासदार (BJP MP Join TMC) बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकीय संसन्यास घेणार असल्याचे म्हटले होते. परंतु, आता त्यांनी भाजपला रामराम ठोकत थेट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (Join Trinamool Congress) प्रवेश केला आहे. बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला हा मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन (derek obrien) यांच्या
उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले आहेत, असे ट्विट तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.

दोन महिन्यापूर्वी संन्यास घेण्याची घोषणा

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यापूर्वीच राजकारण सोडून संन्यास घेण्याची घोषणा केली होती.
त्यांनी फेसबुकवरुन ही घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता.
मोदी सरकारच्या (Modi government) विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. यातूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

 

फेसबुकवरुन नाराजी व्यक्त

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकच्या माध्यातून नाराजी व्यक्त करत राजकीय संन्यासाबाबत भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या होत्या.
सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं.

अलविदा…. मी…

अलविदा मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम यापैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही.
सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही असे त्यांनी म्हटले होते.
मात्र, आता त्यांनी थेट ममता बॅनर्जींच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 

Web Title : BJP MP Join TMC | babul supriyo former union minister and mp babul supriyo joins trinamool congress in preseance of abhishek banerji

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nagpur News | नागपुरमधील बुटीबोरी येथे 50 खासगी रुग्णालये एकत्र येऊन उभारणार Oxygen प्लांट

Pune Police Recruitment | पुणे पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

Ajit Pawar | ‘सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…