ठाकरेंचा Real Estate चा व्यवसाय आहे का ? किरीट सोमय्याकडून पत्रकार परिषदेत ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार (land-transactions-between-thackeray-and-naik-family) झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा केला आहे. ठाकरे कुटुंबाची (Thackeray family) जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा सवाल सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंब कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असते, लोकांना तसे वाटते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे.

वायकर आणि ठाकरे कुटुंबाने रायगडमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत असे किती व्यवहार केले आहेत? त्यांचे संयुक्तपणे किती व्यवसाय आहेत?, असे सवाल सोमय्यांनी उपस्थित केले. ठाकरे-वायकर यांनी नाईक कुटुंबाशी केलेला व्यवहार जुना असताना फडणवीस सरकार असताना त्याबद्दलच्या चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्यावर स्थानिक लोक जमीन व्यवहारांची माहिती देत नाहीत. माझी सासूरवाडी रायगडमध्ये आहे. तिथे गेलो असताना व्यवहाराची माहिती मला मिळाली, असे उत्तर सोमय्यांनी दिले आहे.

भागीदारीत जमीन खरेदीस मनाई आहे का, वायकर यांच्याकडून सोमय्यांना प्रत्युत्तर
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले. ‘रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.