निकालानंतर ‘मातोश्री’समोर येऊन कायमची तोंडं बंद करेन, नारायण राणेंचा शिवसेनेला ‘इशारा’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक होऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर येऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राणे गप्प बसतील असे कोणाला वाटत असले तर तसे होणार नाही असे सांगत जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या असतील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. नारायण राणे सावंतवाडी येथे झालेल्या सभात बोलत होते.

तर मुख्यमंत्री का बनवले ?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना शिवसेनेने सर्व पदं दिली मात्र राणे यांनी पाठीत खंजीर खूपसला अशी टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, ‘मी’ असा तसा होतो, तर मला मुख्यमंत्री का बनवले ? बेस्ट चेअरमन, शाखाप्रमुख, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही पदे का दिली ? असा सवालही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

दीपक केसरकर ‘जोकर’

दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले, या जिल्ह्याचा पालकमंत्री मंत्रिमंडळात चेष्टा आणि मस्करीचा विषय बनला आहे. मंत्रिमंडळातील जोकर म्हणजे दीपक केसरकर अशा परखड शब्दात नारायण राणे यांनी केसरकर यांच्यावर टीका केली. तसेच त्यांना विकासाची दिशा माहिती आहे का ? असा सवाल उपस्थित केला.

कोकणासाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय ?

पर्यटनात गोवा सिंधुदुर्ग पेक्षा जास्त पुढे असल्याने गोव्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करणार आहे. कोकणाच्या विकासासाठी उध्दव ठाकरे यांनी काय केलं? त्यांचं योगदान काय? शिवसेनेच्या नेत्यांनी काय केलं कोकणासाठी? यांसारखे सवाल राणे यांनी यावेळी उपस्थित करत शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी