BJP MP Pritam Munde | भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचे महत्वाचे वक्तव्य, पंकजा मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला पालकमंत्री (Beed Guardian Minister) म्हणून लाभाव्यात, असे वक्तव्य भाजपा खासदार प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी केले आहे. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा नेत्या पंकजा मुंडे मागील काही महिन्यांपासून नाराज असून त्यांचे पक्षाअंतर्गत खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्येही रोष आहे. या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

 

खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) आपल्या भाषणात म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी जसे होते, त्यापेक्षा अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून केला आहे. मागील पाच वर्षात अंबाजोगाई शहराला (Ambajogai City) चारही बाजुंनी राष्ट्रीय महामार्गांनी वेढण्याचे काम करण्यात आले. आपण जेवढ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊ, तेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगाला चालना मिळते.

 

प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, त्यामुळे येथून पुढील काळातही आपण असे काम करतच राहू.
यासाठी पंकजा मुंडे पुन्हा एकदा आपल्याला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून लाभाव्यात.
ज्यामुळे मागील काही काळात बीड जिल्ह्याचा जो अनुशेष बाकी राहिला आहे.
तो त्यांच्या माध्यमातून भरून निघेल. यासाठी पंकजाताई तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा जास्त जिल्ह्याला शुभेच्छा देते.

Web Title :- BJP MP Pritam Munde | preetam munde statement on pankaja munde beed district guardian minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली