Video : डॉ. प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्‍नाला स्मृती इराणींचं ‘मराठमोळ’ उत्‍तर ; म्हणाल्या, ‘मी देखील महाराष्ट्राचीच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या तारांकित प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापुस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडुन विशेष मदत मिळावी अशी मागणी खासदार प्रीतम मुंडे यांनी आज तारांकित प्रश्न विचारत केली. या प्रश्नाचे उत्तर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मराठीत दिले.

स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत मी ही महाराष्ट्राचीच असल्याचेही सांगितले. ‘मी महाराष्ट्राचीच असून मला देखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत’, असे स्मृती इराणी यांनी म्हटले. यावेळी स्मृती इराणी यांनी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही प्रीतम मुंडे यांना दिलं. महिला आणि बालकल्याण मंत्रालयासह वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारीही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे.

प्रीतम मुंडे यांनी इंग्रजीत स्मृती इराणी यांना प्रश्न विचारला होता मात्र स्मृती इराणी यांनी मराठीतून उत्तर दिले. वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं. ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी खासदार प्रीतम मुंडे यांनी केली होती.

दीपिका पादुकोणला ‘या’ खेळाडूवरील बायोपिकमध्ये काम करण्यात ‘रस’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

यापैकी १ % आरक्षण कमी करून अनाथांना द्या – बच्चू कडू

मराठा आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालामुळे न्यायालयात ‘टिकलं’

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा