BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – BJP MP Raksha Khadse | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत (jalgaon district central cooperative bank elections) भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse), विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ (mla smita wagh) यांचा अर्ज बाद झाला आहे.

मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी (Muktainagar Vikas Sahakari Society) मतदारसंघात महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर याच मतदार संघातून त्यांचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) हे देखील उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र ऐनवेळी रक्षा खडसे  यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे अमळनेर विकास सोसायटीमधून (Amalner Vikas Society) स्मिता वाघ (MLA Smita Wagh) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचाही अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटी मधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (Congress MLA Anil Patil) यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  jalgaon district bank elections bjp mp raksha khadse and mla smita wagh candidature rejected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update