लोकसभेत ड्रग ट्रॅफिकिंगच्या प्रकरणावर ‘चर्चा’, रवि किशन म्हणाले – ‘फिल्म इंडस्ट्री अंमली पदार्थाच्या विळख्यात, तपास चालू राहू द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांतसिंग राजपूत प्रकरणातून बाहेर पडलेल्या ड्रग्सच्या प्रकरणाचा सोमवारी संसदेतही उल्लेख करण्यात आला. भोजपुरी सुपरस्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रवी किशन यांनी लोकसभेत मादक पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारला याची चौकशी करण्याचे आवाहन केले.

झिरो अवर दरम्यान रवि किशन यांनी लोकसभेत सांगितले की मादक द्रव्यांच्या विक्रीचा मुद्दा वाढत आहे आणि चीन व पाकिस्तानमधून ड्रग्ज येत आहेत.

हे ड्रग फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील वापरले जात आहे, एनसीबीने अनेक लोकांना पकडलं असंही ते म्हणाले. केंद्राकडून अशी मागणी केली जात आहे की अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुद्द्यावरील तपास वेगाने सुरू ठेवावा. रवी किशन म्हणाले की, तरुण पिढी ड्रग्जच्या व्यसनामुळे उध्वस्त होत आहे, त्यामुळं यावर कारवाई करण्याची गरज आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीनंतर ड्रग्स अँगलचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणात नारकोटिक्स ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह पाच ते सहा लोकांना अटक केली आहे. याशिवाय एनसीबीचा सातत्याने तपास केला जात असून आतापर्यंत बरेच ड्रग्स पेडलर ताब्यात आले आहेत.

रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांना ड्रग्ज खरेदी करण्याच्या आणि पैशांची व्यवस्था करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. तसेच हा एक मोठ्या ड्रग कार्टेलचा भाग असल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूडमध्येही ड्रग कार्टेलची चौकशी झाली पाहिजे, अशी सतत मागणी होत आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं याबाबत सतत ट्विट केले असून आता हा मुद्दा संसदेपर्यंत पोहोचला आहे.