जया बच्चन यांना रवि किशन यांनी सुनावलं, म्हणाले – ‘ड्रग रॅकेट उध्दवस्त करणं गरजेचं, त्यांच्याकडून समर्थनाची होती अपेक्षा’

नवी दिल्ली : फिल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये ड्रग्स कनेक्शनच्या तपासात बॉलीवुडचे नाव समोर आले आहे. सोमवारी भारतीय जनता पार्टीचे खासदार रवी किशन यांनी या प्रकरणात लोकसभेत आवाज उठवला, ज्यावर मंगळवारी राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी पलटवार केला आणि रवी किशन यांच्यावर टीका केली. आता भाजपा खासदाराने सुद्धा उत्तर दिले आहे. रवी किशनने म्हटले आहे की, मला अपेक्षा होती की जया बच्चन मला सपोर्ट करतील.

रवी किशन यांनी म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वचजण ड्रग अ‍ॅडिक्ट नाहीत, परंतु आपण हे नाकारू शकत नाही की, तेथे ड्रग कार्टेल आहे. रवी किशन यांनी म्हटले हे ड्रग कार्टेल नेस्तनाबूत केले पाहिजे.

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर रवी किशन म्हणाले, कदाचित त्यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले नाही, आम्हाला आमची इंडस्ट्री आणि तरूणांना वाचवायचे आहे. मला अपेक्षा होती की, एक वरीष्ठ असल्याने ही बाब समजून घेतील. परंतु जे काही म्हटले गेले, त्यावर मी माझी लढाई सुरू ठेवणार आहे.

जया बच्चन यांनी काय म्हटले होते ?
समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी सभागृहात बॉलीवुडचे प्रकरण उचलून धरले, त्यांनी म्हटले की, आज फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा कट सुरू आहे. आपल्या वक्तव्यात त्यांनी रवी किशन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

जया बच्चन म्हणाल्या, काल लोकसभेत एका खासदाराने बॉलीवुडबाबत वक्तव्य केले, ते याच इंडस्ट्रीतील आहेत. सपा खासदार जया बच्चन यांनी म्हटले होते जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं. हे चुकीचे आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

सोमवारी रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग ट्रॅफिकिंगच्या प्रकरणावर आपली म्हणणे मांडले होते. त्यांनी म्हटले होते की, या देशातील युवकांचे नुकसान होत आहे आणि बॉलीवुडमध्ये सुद्धा हे कार्टेल अ‍ॅक्टिव्ह आहे. ज्याचा तपास केला पाहिजे.