भाजपचे मंत्री दानवेंचा फोटो पाहून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा चढला ‘पारा’, पदाधिकाऱ्यांना घेतलं ‘फैलावर’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद महापालिकेतील नवनिर्वाचीत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना पदभार देण्यासाठी शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज महापालिकेत उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी ते महापौरांच्या दालनात जाताच खैरे यांना खुर्चीच्या मागे असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा फोटो दिसला अन् त्यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

चंद्रकांत खैरे यांनी आदेश देताच कार्यकर्त्यांनी फोटो काढला. त्यानंतर जंजाळ यांना पदभार देण्यात आला. दरम्यान युती असताना खैरे-दानवे यांच्यातील वाद अनेकदा समोर आला होता. माझ्या पराभवामागे दानवेंचा हात असल्याचा आरोप खैरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचे कारण पुढे करत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला. या रिक्त पदासाठी देण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपला दूर ठेवत शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी 51 मते घेत विजय मिळवला.

ज्या योजनांना आदेश दिलेले नाहीत, अशा सर्व योजनांना स्थिगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यात औरंगाबाद शहराच्या अलीकडेच मंजूर करण्यात आलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मिळालेली मंजुरी अडकली. यावरुन भाजपने शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सेना- भाजपमधील महापालिकेतील युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले. या राजीनाम्यामुळे उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली.

काँग्रेस, राष्ट्रवादीमधील सर्व सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या दोन सदस्यांच्या पाठिंब्यावर राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर झाले. महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन महिने असताना घडलेले हे राजकीय बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?