भरधाव कारची क्लबच्या भिंतीला धडक, भाजप खासदार रूपा गांगुलीच्या मुलाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कार दुर्घटनेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदार रूपा गांगुली यांचा मुलगा आकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाशवर आरोप आहेत की, अपघाताच्या वेळी आकाश नशेत होता, यामुळे पोलिसांनी कलम ४२७ आणि कलम २७९ नुसार तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, भाजप खासदार रूपा गांगुली यांचे २१ वर्षीय पुत्र आकाश यांनी दक्षिण कोलकत्याच्या भागात एका क्लबच्या भिंतीवरती आपली गाडी आपटली.  या अपघातामुळे अनेक लोक थोडक्यात वाचले. यामध्ये भिंतीचा काही भाग पडला आणि आकाशला यामध्ये किरकोळ जखम झाली. काही वेळातच जाधवपूर पोलीस स्टेशनचच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आकाशला ताब्यात घेतले. पोलिसांचा आरोप आहे की, ज्या वेळी दुर्घटना झाली त्यावेळी आकाश नशेत होता.

या दुर्घटनेमुळे आणि पोलिसांच्या वागणुकीला वैतागून रूपा गांगुली यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट केले आहे.

काय म्हणलय रूपा गांगुली यांनी ट्विटमध्ये –
माझ्या मुलाचा अपघात माझ्या घराच्या शेजारीच झाला, मीच याबाबत पोलिसांना फोन केला कारण यावर कारवाई व्हावी आणि यात कोणता पक्ष कोणीही राजकारण करू नये. मी माझ्या मुलावर प्रेम करते आणि मी त्याची काळजी घेईन मात्र कायद्याने आपले काम केले पाहिजे. त्या मोदींना टॅग करत म्हणतात ‘मी चुकीचं काही करत नाही आणि चुकीचं सहनही करत नाही कारण मी बिकाऊ नाही’.

आरोग्यविषयक वृत्त –