साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘हेमंत करकरेंनी शिक्षकाची बोट छाटली होती, ते देशभक्त नव्हते’

पोलीसनामा ऑनलाइन – MP Pragya Singh Thakur | भाजपाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) या नेहमीच वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करत असतात. पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून त्या चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्यात ( Mumbai attack) शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे (Former ATS chief Hemant Karkare) यांच्याविषयी वादग्रस्त विधान केेले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

जे लोक करकरेंना देशभक्त संबोधतात त्या करकरेंनी लोकांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी शिक्षकांची बोटं छाटण्याचं काम केलं होतं. ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिल त्या शिक्षकाची बोट करकरेंनी छाटल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे कुणासाठी केल होतं? आणि ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, अशी विचारणा साध्वी ठाकूर यांनी केली आहे.

सीहोर येथे एका कार्यक्रमात प्रज्ञा सिंह ठाकूर बोलत होत्या. देशात एक आणीबाणी (Emergency) माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनी (Former Prime Minister Indira Gandhi) 25 जून 1975 रोजी लागू केली होती आणि दुसरी आणीबाणी तेंव्हा लागू झाली जेव्हा 2008 साली मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला त्यांनी तुरुंगात टाकल, असे त्या म्हणाल्या. लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानतात पण मी तस मानत नाही. ते देशभक्त नव्हते. देशात जे वास्तवात देशभक्त असतात त्यांना देशभक्त मानल जात नाही, असे त्या म्हणाल्या.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : bjp mp sadhvi pragya controversial statement hemant karkare said hemant karkare had committed

हे देखील वाचा

Pregnant Women Vaccination | ‘प्रेग्नंट’ महिला सुद्धा घेऊ शकतात व्हॅक्सीन – आयसीएमआर

DRDO नं पिनाक रॉकेटची केली यशस्वी चाचणी; क्षणात शत्रूला करू शकते ‘खाक’ (Video)

खुशखबर ! Taxpayers ला मोदी सरकारकडून मिळाला मोठा दिलासा; Pan-aadhaar ची तारीख सुद्धा वाढली, जाणून घ्या

Paranjape Builders Latest News | शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे पुण्यात परतले, कंपनीकडून देण्यात आलं ‘हे’ स्पष्टीकरण